पोलीस प्रशिक्षण केंद्रात १७० जणांना कोरोनाची लागण

पोलीस प्रशिक्षण केंद्रात १७० जणांना कोरोनाची लागण

नाह्सिक शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनामुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटना ताजी असताना नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे आरोग्य विभाग हादरून गेला आहे.

कोरोनाबाधितांमध्ये पोलीस प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी आणि कर्मचार्‍यांना शहरातील ठक्कर डोम कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रांत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण दिले जाते.

First Published on: December 24, 2020 3:14 PM
Exit mobile version