250 शिक्षक फेब्रुवारीच्या वेतनापासून वंचित

प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन कपात केली असताना जिल्ह्यातील 26 शाळांमधील सुमारे 250 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना फेब्रुवारी महिन्याचे वेतनच मिळालेले नाही. फेब्रुवारीच्या वेतनात आयकर विभागाने कपात केलेली असल्याने नेमके याच महिन्याचे वेतन शिक्षकांना न मिळाल्याने सर्व कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. करोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनात काही प्रमाणात कपात केली आहे. मात्र, उर्वरीत वेतन हे नियमाप्रमाणे दिले जात आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालेला असल्याने सर्वच कर्मचार्‍यांचे वेतन देणे शासनाला शक्य होत नाहीये. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील 26 शाळांमधील सुमारे 250 कर्मचार्‍यांना फेब्रुवारी महिन्यापासून वेतनाची प्रतिक्षा लागून आहे. तांत्रिक कारणामुळे या शिक्षकांचे वेतन थांबले आहे. याविषयी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्‍यांनी वेतन पथकाचे अधिक्षक उदय देवरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानी शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. परंतु, या शिक्षकांना अद्याप वेतन मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांचा दरवाजा ठोठावण्याची तयारी मुख्याध्यापक संघाने सुरु केली आहे.
….
या शाळेतील कर्मचार्‍यांचे वेतन थकले
सेवाधन हायस्कूल नाशिकरोड, जनता विद्यालय अजमेर सौंदाणे, सेकंडरी हायस्कूल अंबासन, जनता विद्यालय दहेगाव, माध्यमिक विद्यालय राहुड, अ‍ॅग्लो उर्दु हायस्कूल इगतपुरी, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय खेड, सरस्वती माध्यमिक विद्यालय दाभाडी, शुभदा माध्यमिक विद्यालय सोयगाव, बी. बी. निकम कन्या विद्यालय दाभाडी, न्यू इंग्लिश नांदगाव, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड, एच. ए. के. हायस्कूल मनमाड, जनता विद्यालय विठेवाडी, माध्यमिक विद्यालय धामनगाव, के. जे. मेहता हायस्कूल नाशिकरोड, रचना सेकंडरी विद्यालय शरणपूर रोड, नूतन विद्यामंदीर सेकंडरी, ग्रामउद्योग सेकंडरी हायस्कूल सिडको, के. बी. पी. ज्युनिअर कॉलेज आसखेडा, न्यू इंग्लिश स्कूल डोंगराळे (ता.मालेगाव), जांभुर हायस्कूल, जनता ज्यूनिअर कॉलेज झोडगे, जनता ज्युनिअर कॉलेज आगार, सुधाकरराव माळी माध्यमिक विद्यालय, लोढरे.

First Published on: May 2, 2020 5:25 PM
Exit mobile version