कारचे लोन न फेडता बँकेची ११ लाखांची फसवणूक

कारचे लोन न फेडता बँकेची ११ लाखांची फसवणूक

कारसाठी एका तरुणाने ११ लाख रुपयांचे कर्ज घेत परतफेड न करता स्टेट बँकेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरस्वती हाईट्स, थत्तेनगर, गंगापूर रोड येथील स्टेट बँकेचे ज्योतिष दिनेश सुधाकर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित नामदेव भरत धनकर (रा. गणेश नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नामदेव धनकर यांचे स्टेट बँकेत खाते आहे. त्यांना फोर्ड इकोस्पोर्ट कार खरेदीसाठी ११ लाख रुपयांची गरज होती. त्यांनी बँकेकडून कारसाठी ११ लाखांचे कर्ज मंजूर करुन घेतले. त्यानंतर कार (एमएच १५ जीएफ ८३३५) खरेदी करुन आरटीओ, नाशिककडून रजिस्टर करुन घेतली. त्यांनी कर्जापोटी लाभात हायपोथीकेट करुन कर्जाची परतफेड केली नाही. कारवर कर्ज असतानाही बँकेची दिशाभूल करण्यासाठी दस्तऐवज बनवून बँकेची पूर्वपरवानगी न घेता कार भोपाळ आरटीओ येथे हटवली. त्यातून धनवट यांनी बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार करत आहेत.

First Published on: December 21, 2021 3:59 PM
Exit mobile version