लाच प्रकरण : शिक्षणाधिकारी झनकरांची तुरुंगात रवानगी

लाच प्रकरण : शिक्षणाधिकारी झनकरांची तुरुंगात रवानगी

शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी आठ लाख रुपये लाच घेताना पकडल्या गेलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.20) सुनावणी होणार आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने जिल्हा रुग्णालयाकडे डॉ. वैशाली झनकर यांच्यावरील उपचाराचा अहवाल मागवला आहे. डॉ. झनकर यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांची रवानगी नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

गत आठवड्यात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत चौकशी करण्यासाठी डॉ. झनकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली होती. मात्र, त्या आजारी असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार होत्या. त्यामुळे ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकास चौकशी करता आली नाही. पथकाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने सोमवारी एक दिवसाच्या कोठडीत वाढ केली. त्यानुसार न्यायालयात मंगळवारी त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चौकशी पूर्ण झाल्याने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर डॉ. झनकर यांनी प्रकृती बिघडल्याची तक्रार केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. झनकर यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बुधवारी (दि.१८) जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, वकील गैरहजर असल्याने ही सुनावणी शुक्रवारी (दि.२०) होणार आहे. त्यामुळे डॉ. झनकर यांना कारागृहात पाठवण्यात आले. तर दशपूते व येवले यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

First Published on: August 18, 2021 9:26 PM
Exit mobile version