जमिनीच्या मोजणीवरून दोन गटांत हाणमारी

जमिनीच्या मोजणीवरून दोन गटांत हाणमारी

श्रीगोंदा : शेतीच्या वादातून तालुक्यातील लिंपणगाव येथे दोन गटात जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी झाली. यात प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापू माने आणि त्यांचे चिरंजीव यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी लिंपणगाव येथील १३ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लिंपणगाव येथील अशोक ओहोळ यांनी शेतजमीन २५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष माने यांना विकली होती. या जमिनीशेजारी प्रविण कुरुमकर यांची जमीन आहे. या दोघांत जमिनीच्या हद्दीवरून वाद असल्याने या जमिनीची मोजणी करून माने यांना ताब्यात देण्यासाठी शासकीय मोजणी बोलावली होती. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू केली. प्रविण कुरुमकर, संतोष भोंडवे, किरण भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, शुभांगी कुरुमकर, मनिषा भोंडवे, संभाजी सूर्यवंशी, विजय कुरूमकर, उमेश वेताळ, मयूर चव्हाण, हनुमंत रेवगे, निता पंधरकर यांनी मोजणी ठिकाणी येऊन ओहोळ यांना शिवीगाळ करत बापू माने आणि त्यांचा मुलगा उदय यांना शिवीगाळ केली. प्रविण कुरूमकर याने उदयच्या डोक्यात खुरपे मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणील १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

First Published on: August 4, 2022 4:23 PM
Exit mobile version