मंगेश चिवटेंना कर्तव्यनिष्ठ अधिकारी पुरस्कार

मंगेश चिवटेंना कर्तव्यनिष्ठ अधिकारी पुरस्कार

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्विय सहायक विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना अ‍ॅण्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियातर्फे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पुरस्कार घोषित झाला आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाकाळात गरजू. गरीब रुग्णांना त्यांनी अहोरात्र व पारदर्शक सेवा केली.आणि करत आहेत.या कार्याची माहिती महाराष्ट्र पुरती नसून कर्नाल दिल्ली पर्येंत पोहचली आहे म्हणून चिवटे यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे अँटी करप्शन ऑफ इंडिया फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोनाकाळात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी श्रीकांत फाऊंडेशनच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे चिवटे यांची ओळखच रुग्णसेवक अशी झाली. विशेष म्हणजे निस्वार्थपणे त्यांनी हा सेवाभाव जोपासला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मूळ रहिवाशी असेलले चिवटे यांची आरोग्यसेवक ही ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल अ‍ॅण्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियातर्फे लवकरच कर्तव्यनिष्ठ अधिकारी पुरस्काराने सन्माणित केले जाणार आहे. अ‍ॅण्टी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र अरोरा, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुधाकर जाधव, महाराष्ट्र राज्य सचिव महेंद्र अंधारे, महाराष्ट्राचे इनचार्ज हेमंत गवळी, महाराष्ट्राचे संचालक ज्ञानेश्वर सहाने, प्रविण इटानकर, जगदीश अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

First Published on: September 28, 2022 2:28 PM
Exit mobile version