राहुरीत कोरोनाचा शिरकाव; मामाकडे आलेला भाचा पॉझिटिव्ह

राहुरीत कोरोनाचा शिरकाव; मामाकडे आलेला भाचा पॉझिटिव्ह
मुंबईच्या रेड झोन मधून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे असलेल्या आपल्या मामाकडे आलेला भाचा कोरोनाबाधित आढळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना मुक्त असलेल्या राहुरी तालुक्यात पहिला रुग्ण आढळल्याने राहुरीकर आणि प्रशासनासमोरील चिंता वाढल्या आहेत.
मुंबईच्या चेंबूरमधील २६ वर्षीय तरुण वांबोरी येथील आपल्या मामाकडे १७ मे ला आला होता. राहुरी प्रशासनाला याची माहिती समजतात महसूल व पोलिस पथकाने तात्काळ वांबोरी येथे जाऊन या तरुणांसह त्याचा आणखी एका जोडीदाराला गावातील शाळेत निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले होते. शनिवारी या तरुणाला घशात त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. रविवारी सकाळी त्याच्या घशातील स्त्रावाचे जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर हा तरुण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला, त्यामुळे त्याच्यावर नगरचाच बूथ रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
या तरुणाचा अहवाल पॉझिटिव आल्याची माहिती मिळताच श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वांबोरी येथे धाव घेऊन प्रशासकीय पातळीवर सतर्कता बाळगत बाधित रुग्णाच्या संपर्कातील परिसर सील केला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतरांचीही प्रशासन कसून चौकशी करीत  असून संपर्कात आलेल्याना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाणार आहे. सध्या शाळेतील क्वारंटाईन कक्षात २० व्यक्ती आहेत. गावातील काही भागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तुकड्या तयार करून नागरिकांची तपासणी करण्यास येणार आहे.
चेंबूरमधून वांबोरीत आलेल्या या तरुणांमुळे राहुरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने राहुरीकरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत नागरिकांच्या सहकार्याने तालुका कोरोनामुक्त ठेवण्यास प्रशासनाला यश आले होते, आता मात्र कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे.
बाधीताचा असा झाला चेंबूर ते वांबोरी प्रवास
मुंबईच्या चेंबूरमधून निघालेल्या तरुणाने पारनेरमार्गे कारने प्रवास केला. तेथुन काही किलोमीटर पायी चालत तर नंतर एका मोटरसायकलवरून प्रवास करत हा तरुण १७ मे रोजी पहाटे वांबोरीत दाखल झाला होता. मामाकडे आलेल्या या तरुणाबद्दल माहिती मिळताच प्रशासनाने सतर्कता दाखवून त्याला गावातील शाळेत क्वारंटाईन केले
First Published on: May 24, 2020 6:48 PM
Exit mobile version