येत्या आठवड्यात नाशिकमध्ये करोना टेस्टींग लॅब

येत्या आठवड्यात नाशिकमध्ये करोना टेस्टींग लॅब

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोना टेस्टिंग लॅब येत्या आठवड्यात सुरु होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर व मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार व उपजिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवारी (दि.18) या लॅबची पाहणी केली.  डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोनो टेस्टिंग लॅब उभारणीचे काम  युद्धपातळीवर सुरु आहे. या लॅबमधील यंत्र सामुग्री व कामकाजाची माहिती त्यांनी घेतली. येत्या आठवड्यात लॅबच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार असून लवकरच ही लॅब नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी सांगितले. यावेळी मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. नीता गांगुर्डे व दातार लॅबचे संचालक उपस्थित होते.

First Published on: April 19, 2020 2:39 PM
Exit mobile version