घरातील फ्रीज, टिव्ही, विजेचा मेन स्विच बंद करु नका!

घरातील फ्रीज, टिव्ही, विजेचा मेन स्विच बंद करु नका!

Electricity

नाशिक : करोनाचा अंध:कार दुर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.5) रात्री 9 वाजता घरातील दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे. एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील वीज बंद झाल्यास त्याचा पॉवर स्टेशनवर मोठा ताण पडणार असून जास्त दाबाने वीज पुरवठा सुरु झाल्यास घरातील विजेची उपकरणे जळण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरीकांनी घरातील दिवे फक्त बंद करावे, मेन स्विच किंवा फ्रीज, टिव्ही आदी उपकरणे बंद करु नये, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता बी. के. जनवीर यांनी ‘आपलं महानगर’च्या माध्यमातून केले आहे.
…काय करावे
-घरातील विजेचे दिवे फक्त बंद करा
-टिव्ही, फ्रीज नेहमीप्रमाणे सुरु ठेवा
-साधारणत: 8 वाजेपासून विज उपकरणे सुरु ठेवावी
-आपल्या भागातील वायरमन, अधिकार्‍यांचे नंबर घेवून ठेवा
…काय करु नये
-विजेचा मेन स्विच बंद करु नका
-घरातील फ्रीज, टिव्ही, वॉशिंगमशीन बंद ठेऊ नये
-हॉस्पिटल, इमारतींच्या लिफ्टचा विज पुरवठा खंडीत करु नका
-बंद असलेली उपकरणे तत्काळ सुरु करु नका
-कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका

First Published on: April 4, 2020 5:46 PM
Exit mobile version