इलेक्ट्रिक स्कूटर चोरट्यास अटक; लपवलेल्या दोन दुचाकी जप्त

इलेक्ट्रिक स्कूटर चोरट्यास अटक; लपवलेल्या दोन दुचाकी जप्त

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने वाहनचालक इलेक्ट्रिक बाईकला पसंती देत असल्याचे दिसून येत असतानाच चोरट्यांनीसुद्धा ईलेक्ट्रिक स्कूटर चोरी सुरु केल्याचे नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईवरुन समोर आले आहे. नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने इलेक्ट्रिक स्कूटर चोरट्यास अटक केली. पथकाने त्याच्या ताब्यातून लपवून ठेवलेल्या दोन स्कूटर जप्त केल्या. फिरोज आयुब शेख (वय २२, रा. जाखोरी, ता. जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नाशिक शहरातील घरफोडी, दुचाकी चोरी गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना नाशिक शहर गुन्हे शाखांना दिल्या आहेत. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.१३) पथकाने शोध मोहीम सुरु केली असता संशयित फिरोज शेख याच्याकडे चोरीच्या दोन इलेक्ट्रीक दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. पोलीस चौकशीत त्याने घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेल्या दोन स्कूटर दाखवल्या. त्याने त्या स्कूटर अंबड पोलीस ठाणेहद्दीतून चोरी केल्याचे सांगितले. पथकाने अंबड पोलिसांशी संपर्क साधत चोरीच्या दुचाकींबाबत चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले.

First Published on: January 14, 2022 3:45 PM
Exit mobile version