लासलगावमध्ये शेकडो आधार कार्ड भंगारात!

लासलगावमध्ये शेकडो आधार कार्ड भंगारात!

लासलगावमध्ये शेकडो आधारकार्ड भंगारात!

ग्रामीण भागाचा आत्मा असलेला पोस्ट ऑफीसचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा निदर्शनास आला आहे. दैनंदिन काम करुन सामन्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता रांगेत उभे राहून आधार कार्ड काढले. आणि पोस्टमास्तरने आलेले शेकडो आधारकार्ड जनतेला घरी न पोहचविता पोहचविले रद्दीवाल्याकडे. परंतु या भंगार विक्रेत्यांने शेकडे लाभार्थ्यांचे आधार कार्ड घरापर्यंत पोहच करून माणसुकीचे दर्शन घडवले.

सोशल मीडिया आले कामी!

अतिक शेख यांनी गरिबीतून तोडक्या पैशावर सुरु भंगार व्यवसाय सुरु केलेला आहे. अतिक शेख व राकेश शेजवळ, उमेश शेजवळ यांनी ओळखीतल्या नागरिकांना फोन करुन आधारकार्ड वाटप सुरु केलेले आहे. ज्यांची ओळख पटली नाही ते आधारकार्ड त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी बाबासाहेब गिते यांच्याकडे सुपुर्द केले. गिते यांनी सर्व लाभार्थ्यांची यादी तयार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन आधार कार्ड घेऊन जाणेबाबत कळवले.

पोस्टमास्तरवर कारवाईची मागणी

वास्तविक पोस्टमास्तर यांनी सदर आधारकार्ड हे लाभार्थ्यांना घरपोहोच देणे गरजेचे होते. पण अनागोंदी कारभारामुळे सदर आधारकार्ड लाभार्थ्यांऐवजी पोहोचले भंगारवाल्याकडे. संबंधित पोस्टमास्तर यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

संबंधित आधारकार्डधारकांना आधारकार्ड हे ग्रामपंचायत लासलगांव येथून मिळण्याची सुविधा जयदत्त होळकर यांनी केलेली आहे. ज्यांचे आधारकार्ड अतिक शेख व राकेश शेख यांनी ग्रामपंचायतीत मध्ये जमा केलेले आहे. त्यांची यादी सोशलमिडीयावर टाकण्यात येईल.
– जयदत्त होळकर, सभापती, बाजार समिती, लासलगाव

जे आधारकार्ड भंगार व्यवसायिकांनी ग्रा.पं. कर्मचार्‍याकडे जमा केले. ते सर्व संजयनगर, राजवाडा या परिसरातील असून, तेथील लाभार्थी गरीब आहेत. याची पूर्ण चौकशी होवुन संबंधित पोस्ट ऑफीसच्या कर्मचार्‍यास योग्य ते शासन होणे गरजेचे आहे.
– संगीता शेजवळ, सरपंच, लासलगाव


हेही वाचा – वाढत्या थंडीने द्राक्ष निर्यातदार चिंतित
First Published on: January 3, 2019 8:00 AM
Exit mobile version