नाशिक ग्रामीण पोलीस दलात जम्बो खांदेपालट; तब्बल २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक ग्रामीण पोलीस दलात जम्बो खांदेपालट; तब्बल २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील २९ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. यात २२ पोलीस निरीक्षक व सात सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विनंती तसेच प्रशासकीय कारणांमुळे रिक्त पदांवर अधिकार्‍यांना बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पोलीसआस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकारानुसार पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

इगतपुरी व ओझर पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांवर कामकाजात गंभीर कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांची नाशिक नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, बदली झालेल्या इतर सहा अधिकार्‍यांना पदस्थापनेची प्रतीक्षा असून, त्यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमित केले जातील.

नाशिक नियंत्रण कक्षातील १३ पोलीस अधिकार्‍यांकडे स्वतंत्र पोलीस ठाण्यांची धुरा सोपविण्यात आली आहे. बदलीने पदस्थापना मिळालेल्या अधिकार्‍यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश दिले आहे. पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, अनिल भवारी, दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते व सागर कोते यांना पदस्थापनेची प्रतिक्षा आहे. इगतपुरीचे निरीक्षक वसंत महादू पथवे व ओझरचे निरीक्षक अशोक रहाटे यांची कामकाजातील कसुरीमुळे नाशिक नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.

बदली झालेले पोलीस अधिकारी (कंसात बदलीचे ठिकाण)

पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार (पिंपळगाव बसवंत), पोलीस निरीक्षक बिपीन पांडुरंग शेवाळे (त्र्यंबकेश्वर), पोलीस निरीक्षक बापू शांताराम महाजन (निफाड), पोलीस निरीक्षक राजेंद्र दामोदर कुटे (सिन्नर), पोलीस निरीक्षक श्याम काळू निकम (एमआयडीसी सिन्नर), पोलीस निरीक्षक बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (मनमाड), पोलीस निरीक्षक पांडूरंग विठ्ठल पवार (येवला तालुका पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक नंदकुमार मोहनराव कदम (येवला शहर), पोलीस निरीक्षक कैलास देविदास वाघ (चांदवड), पोलीस निरीक्षक पंढरीनाथ रघुनाथ ढोकणे (छावणी, मालेगाव), पोलीस निरीक्षक जयराम रामदास छापरिया (किल्ला, मालेगाव) पोलीस निरीक्षक शिवाजी मुरलीधर बुधवंत (मालेगाव शहर), पोलीस निरीक्षक दौलत शिवराम जाधव (आझादनगर, मालेगाव), पोलीस निरीक्षक यशवंत भाऊराव बाविस्कर (रमजानपुरा), पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारावकर (देवळा), पोलीस निरीक्षक दुर्गेश मोहनलाल तिवारी (ओझर), पोलीस निरीक्षक राजू संपत सुर्वे (इगतपुरी), सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिवाजी म्हस्के (हरसूल), सहायक पोलीस निरीक्षक चेतन केदारी लोखंडे (वावी), सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आधार शिरसाठ (जायखेडा), सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार (वडनेर खाकुर्डी).

First Published on: March 10, 2023 7:29 PM
Exit mobile version