चक्क ! पिंपळगाव टोलनाक्यावर पोलीस अधीक्षकांशीच अरेरावी; गुन्हा दाखल

चक्क ! पिंपळगाव टोलनाक्यावर पोलीस अधीक्षकांशीच अरेरावी; गुन्हा दाखल

पिंपळगाव बसवंत : गेल्या आठवड्यात टोल कर्मचाऱ्याने एका दैनिकाच्या उपसंपादकाला बातमी दिली म्हणून दमबाजी केली असल्याची घटना ताजी असताना आता चक्क पोलीस अधीक्षकांची गाडी अडवून त्यांच्यासोबत हुज्जत घालत अरेरावी केल्याची घटना पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर घडली असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोल नाका कर्मचाऱ्यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार पिंपळगाव कडून नाशिकच्या दिशेने ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांची गाडी जात असताना टोलनाक्याच्या लेन जवळ आल्यानंतर स्वतंत्रलेन बंद असल्याने गाडी दुसऱ्या लेनला गेली, मात्र 15 ते 20 मिनिटे होऊनही लेन ओपन होत नसल्याने पोलीस अधीक्षक यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी हुज्जत घालत अरेरावी केली त्यामुळे नाईलाजाने संतापून पोलीस अधीक्षक यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून प्रचलित असलेले पोलीस अधीक्षक सचिन पाटील मालेगाव येथून शासकीय कामकाज आटोपून परतत असताना हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत आता पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यघटनेनंतर सर्वच बाजूंनी संताप व्यक्त होत आहे. पिंपळगाव टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीला आवर घालण्यासाठी आता कठोरतील कठोर पावलं उचलावीत. विशेषतः तेथील महिला कर्मचाऱ्यांची मुजोरी, अरेरावी यावर कायमस्वरूपी ‘योग्य’ उपाययोजना व्हावी अशी मागणी होत आहे.

First Published on: August 20, 2022 12:02 AM
Exit mobile version