नाशिक तालुका पोलीस ठाण्याने टाकली कात

नाशिक तालुका पोलीस ठाण्याने टाकली कात

ब्रिटीश काळात सुरु झालेल्या जुने सीबीएस परिसरातील नाशिक तालुका पोलीस ठाण्याने कात टाकली आहे. पोलीस ठाण्याचे नुतनीकरण करण्यात आले असून, रविवारी (दि.२०) पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोनशिला अनावरण करण्यात आले.

नाशिक तालुका पोलीस ठाणे अद्ययावत करण्याचा संकल्प अधिक्षक सचिन पाटील यांनी 19 सप्टेंबर 2020 रोजी केला होता. हा संकल्प 19 सप्टेंबर 2021 रोजी पूर्णत्वास आला. नूतन इमारत डिजिटल स्वरुपात साकारण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, नागरिकांसाठी अद्ययावत 200 लोकांची बैठक व्यवस्था असलेला वातानुकूलीत हॉल उभारण्यात आला आहे. यावेळी पोलिस उपअधीक्षक शाम निपुंगे, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया आंभोरे, दीपक देसले, शशी हिरवे, योगेश कमोद, पंशुल कमोद, सुला वाईनचे वरीष्ठ उपाध्यक्ष संजिव पैठणकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, हर्षा फिरोदिया, गोरख खांडबहाले, सुशांत शिरसाठ, संतोष कमोद, समीर रहाणे आदी उपस्थित होते.

First Published on: September 20, 2021 7:31 PM
Exit mobile version