‘सिव्हिल’मध्ये रुग्णाकडून नर्स व महिला सफाई कर्मचाऱ्यास मारहाण; पुकारले कामबंद आंदोलन, मात्र…

‘सिव्हिल’मध्ये रुग्णाकडून नर्स व महिला सफाई कर्मचाऱ्यास मारहाण; पुकारले कामबंद आंदोलन, मात्र…

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णानेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वॉर्ड मधील साफसफाई करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना परिचारिकेने बाहेर काढले होते. त्याचबरोबर रुग्णाला एका ठिकाणी बसण्यास सांगितल्याचा राग आल्याने रुग्णानी परिचारिकेला आणि साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केलीय. यात कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे जिल्हा रुग्णालयात काम करणे शक्य नसल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं होत. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आलीय. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आलय.

नाशिक जिल्हा रुग्णालयात याआधीही मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहे. मात्र, आता थेट वॉर्ड मध्ये साफसफाई सुरू असताना बाहेर उभ राहील सांगितल्याने तसेच रुग्णालाही एका बाजूला बसायला सांगितल्याने थेट परिचारिका आणि महिला सफाई कर्मचारी यांच्यावर हल्ला करत मारहाण करण्यात आली आहे. यात रुग्णांचे नातेवाईक तसेच स्वत रुग्णाचाही सहभाग आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने संपूर्ण जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आक्रमक झाले होते. सर्वांनी एकत्र येत सकाळी या मारहाणीच्या विरोधात थेट काम बंद आंदोलन पुकारले. यावेळी जोपर्यंत प्रत्येक वॉर्ड मध्ये स्वतंत्र सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली जात नाही तो पर्यंत काम करणार नाही असा पवित्रा या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक थोरात यांनी यात मध्यस्थी करत सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला जाईल. तसेच मारहाण प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

First Published on: March 1, 2023 7:42 PM
Exit mobile version