संदर्भ सेवा रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

संदर्भ सेवा रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

संदर्भ सेवा रुग्णालय (फाइल फोटो)

शालिमार चौकातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत मालेगावातील पठाण रहीम नब्बी खान (५२) या रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१२) सायंकाळी घडली. खान यांच्यावर रुग्णालयात डायलिसीस करत असतानाच, अचानक त्यांनी थेट खिडकीची काच फोडत उडी मारली.

मालेगाव येथील खान यांच्या किडन्या निकामी झाल्या असल्याने, ७-८ वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. डायलिसीससाठी त्यांना पुन्हा १० जानेवारी रोजी संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शुक्रवारी (दि.११) तीन तास डायलिसीस केले. त्यानंतर एक तास डायलिसीस बाकी राहिले असतानाच, डायलिसीस यंत्रणेच्या सर्व नळ्या काढून फेकत खान यांनी खिडकीलगतच्या रुग्णाच्या कॉटवर उभे राहून खिडकीची काच फोडली. त्यानंतर खिडकीच्या सज्जावर उभे राहत थेट खाली झोकून दिले.

डायलिसीस कक्ष हा संपूर्ण वातानुकूलीत असल्याने, अन्य रुग्णांचा आवाज लगेचच बाहेर गेला नाही. या कक्षाबाहेरच खान यांच्या पत्नी व मुलगादेखील बसलेला होता. अचानक घडलेल्या या धक्कादायक घटनेने रुग्णालय प्रशासनाचीही मोठी धावपळ उडाली. उपस्थित सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील खान यांच्यावर आयसीयूमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डोक्यासह इतर भागांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा

त्या तरुणीच्या मारेकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

 

First Published on: January 12, 2019 7:18 PM
Exit mobile version