बाधितांच्या हातावर मारणार क्वॉरंटाईन शिक्का

बाधितांच्या हातावर मारणार क्वॉरंटाईन शिक्का

कोरोना रूग्णांच्या संख्येत दरराज वाढ होत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रतिबंध घालण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. आता या नियमावलीत अधिक सूधारणा करतांना जे कोरोनाबाधित रूग्णांना होम क्वॉरंटाईन केले आहे. त्यांनी क्वॉरंटाईन नियमाचे पालन करावे, यासाठी त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारण्यात येणार आहे.

वाढती गर्दी, विना मास्क वावर यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे मात्र यात होम क्वॉरंटाईन असलेल्या रूग्णांचा शहरातील वावर धोकादायक बनत असल्याचेही दिसून आले आहे. मध्यंतरी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर होम क्वॉरंटाईन असलेल्या रूग्णांच्याबाबतीत फारसे गांभीर्याने घेतले जात नव्हते मात्र आता मोठया प्रमाणावर रूग्ण होम क्वॉरंटाईन असल्याने त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेता येईल का याचाही अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता होम क्वॉरंटाईन असलेल्या रूग्णांच्या हातावर शिक्का मारण्याचा निर्यणही घेण्यात आला आहे. तसेच कंटेन्मेंट झोनची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी केवळ घरापूरतेच कंटेन्मेंट झोन मर्यादित होते मात्र आता त्या भागात बॅरिकेडींग करण्यात येउन परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

First Published on: March 15, 2021 10:31 PM
Exit mobile version