वणी बसस्थानकात दगडाने ठेचून मारलेल्या ‘त्या’ अज्ञान इसमाच्या खुनाचा अखेर उलघडा

वणी बसस्थानकात दगडाने ठेचून मारलेल्या ‘त्या’ अज्ञान इसमाच्या खुनाचा अखेर उलघडा

नाशिक : वणी बसस्थानक परिसरातील खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी अवघ्या सहा तासांत मृतदेहाची ओळख पटवण्यासह तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. फरार एका संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, ते मृत तरुणाचे मित्र आहेत. त्यांनी आर्थिक देवाण-घेवाणमधून भाच्यांच्या जामिनासाठी आलेल्या तरुणाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

विनोद उर्फ रॉक मधुकर मोरे (वय ३५, रा. भारतनगर, इंदिरानगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. छोटु उर्फ हरीष काळुराम प्रजापती (सर्वजण रा. भारतनगर, इंदिरानगर, नाशिक), दीपक गायकवाड, मतीन आयास काझी अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.वणी बसस्थानकात गुरुवारी (दि.२) रात्री एक ते चार वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाच्या आरोपींनी डोक्यावर व अंगावर दगड टाकून मारले. त्यानंतर बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या बाजूला मोकळ्या जागेत काटेरी झाडांच्या बाजूला मृतदेह ओढत नेउन टाकला. हा प्रकार शुक्रवारी (दि.३) सकाळी उघडकीस आला.

मृत युवकाचा फोटो पोलिसांनी पोलीस ग्रुपवर व्हायरल केला होता. त्यानंतर मृत विनोद मोरेबाबत पोलिसांना माहिती मिळाली.पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मदतीने नाशिकच्या एका संशयितास पकडले. तर उर्वरीत दोन संशयीत आरोपींच्या मुसक्या वणी पोलीसांनी आवळल्या. याप्रकरणी विनोद मोरे याची पत्नी मंगल मोरे यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

असा केला खून

विनोद मोरे याच्या दोन भाच्यांना पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्या जामिनासाठी मोरे हा तीन मित्रांसमवेत गुरुवारी (दि.२) दिंडोरी येथे आला होता. त्यानंतर मोरे व त्याचे मित्र वणीला आले. या ठिकाणी त्यांनी एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली. सर्वांनी वणी बसस्थानक परिसरात रात्री उशीरापर्यंत मद्यपार्टी केली. त्यावेळी मोरे यांना पत्नीने कॉल केला. आर्थिक व्यवहारातील ३० हजार रुपये मोरे यांना द्या, असे तिने मोरेंच्या मित्रांना सांगितले. त्यातून चौघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात व मद्यधुंद अवस्थेत तिघांनी मोरेच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तिघांना मोरेचा मृतदेह वणी

First Published on: March 3, 2023 7:53 PM
Exit mobile version