तरुणाने मुलीशी केली मैत्री, काटा काढण्यासाठी दोघांनी केले भयंकर कृत्य

तरुणाने मुलीशी केली मैत्री, काटा काढण्यासाठी दोघांनी केले भयंकर कृत्य

मुलीशी मैत्री करणे एका तरुणाला महागात पडले. मुलीशी मैत्री केल्याच्या कारणातून टोळक्याने एका तरुणास शिवीगाळ व बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मौनगीरी नगर, हिरावाडी, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी मयुर सुभाष ठोसरे (वय २५) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिरावाडी येथील संशयित गुरुविंदर सिंग सामरा, जसप्रित सामरा यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मयुर ठोसरे यास संशयितांने थांबवले. माझ्या मुलीशी मैत्री का केली, असे म्हणत दोघा संशयितांनी शिवीगाळ व मारहाण केली. पुन्हा आमच्या मुलीच्या नादाला लागल्यास तुझा बेत पाहू, अशी धमकी संशयितांनी त्यास दिली. संशयित यश देसाई यानेही मयुरला मारहाण केली. पुढील तपास पोलीस नाईक व्ही. पी. खाजेकर करत आहेत.

First Published on: August 5, 2021 12:04 PM
Exit mobile version