१५९८ परप्रांतीय रेल्वेने लखनौकडे रवाना

१५९८ परप्रांतीय रेल्वेने लखनौकडे रवाना

प्रातिनिधीक फोटो

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून शुक्रवारी (दि.१५) रात्री सव्वा आठच्या सुमारास उत्तरप्रदेशातील लखनौ कडे १ हजार ५९८ परप्रांतियांना घेऊन रेल्वे रवाना झाली आहे.

लॉकडाऊनमुळे नाशिक शहरात अडकलेल्या परप्रांतीयांना उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात सोडविण्यासाठी आत्तापर्यंत चार रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. आज लखनौ येथे जाणार्‍या गाडीत १ हजार ५९८ प्रवाशांना जिल्हा प्रशासनाकडून तिकीट काढून बसवून देण्यात आले. यापैकी ७५ मुले ५ वर्षाच्या आतील असल्याने त्यांना कोणतेही तिकीट आकारले नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. प्रशासनाने ८ लाख ८३ हजार ३४० रुपयांचा डीडी जमा केल्यानंतर १ हजार ५२३ प्रवाशांची तिकीटे काढण्यात आली होती. पहिली रेल्वे भोपाळ (म.प्र), दुसरी लखनौ (उ.प्र), तिसरी रेवा (म.प्र), चौथी रेल्वे लखनौ (उ.प्र) मधून हजारो प्रवाशी रवाना करण्यात आले आहेत.

First Published on: May 15, 2020 10:24 PM
Exit mobile version