पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप, तरूणीचा अपघाती मृत्यू

पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप, तरूणीचा अपघाती मृत्यू

पेट्रोल पंपासमोर दुचाकी स्लीप झाल्यानंतर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीचालक 20 वर्षीय तरुणीचा जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१९) सकाळी घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण पाटील (वय २०, रा.एकदंत नगर, नवीन नाशिक) मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

किरण पाटील अ‍ॅक्टिवाने पाथर्डी फाटा येथे मैत्रिणीकडे जात होती. नम्रता पेट्रोल पंपासमोरील पान टपरी जवळ डांबरी रस्त्याच्या कडेला तिची दुचाकी घसरली. त्याचवेळी समोरून आलेल्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिने हेल्मेट घातले असते तर तिचा जीव वाचू शकला असता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वाहनचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून
नाशिक शहरात १५ ऑगस्टपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहीम राबविली जात आहे. तरीही बेशिस्त वाहनचालक निष्काळजीपणे विनाहेल्मेट प्रवास करत आहेत. त्यातून अशा अपघातात मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहे.

First Published on: August 19, 2021 4:30 PM
Exit mobile version