‘झेडपी’त अनोखे समाज कल्याण; सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा ‘अँगल’ भलतीकडेच

‘झेडपी’त अनोखे समाज कल्याण; सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा ‘अँगल’ भलतीकडेच

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात एन्ट्रीच्या ठिकाणी कॅमेर्‍याची दिशा वरच्या दिशेने ठेवण्यात आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यामुळे विभागात काही अघटित घडल्यास शोधायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समाज कल्याण विभागात पायर्‍या चढल्यानंतर भिंतीला कॅमेरा लावलेला आहे. या कॅमेर्‍याची दिशा खालच्या दिशेने असायला हवी. मात्र प्रत्यक्षात कॅमेर्‍याची दिशा वरच्या बाजुला ठेवलेली असल्याने अशी करामत कुठल्या बहाद्दराने का आणि कुणाच्या सांगण्यावरुन केली याचा शोध प्रशासनाने घ्यायला हवा अशी चर्चा होतांना दिसुन येत आहे. कॅमेर्‍याची दिशा वरच्या दिशेने का याबाबत प्रहार संघटनेने समाज कल्याण विभागाला विभागाला विचारणा केली होती. याबाबत संघटनेने आवाजही उठविला होता.

विभागात कागदपत्रे गायब झाल्यास किंवा एखादी फाईल गहाळ झाल्यास फाईल कुणी गहाळ केली हे कॅमेर्‍याद्वारे शोधता येऊ शकते. मात्र प्रत्यक्षात कॅमेरा वरच्या दिशेने लावला असल्याने शोध घेणे अवघड आहे. दैनिक आपल महानगरने याबाबत सत्यता जाणुन घेण्यासाठी पाहणी केली असता कॅमेरा वरच्या दिशेने असल्याचे आढळून आले. कॅमेरा वरच्या दिशेने का याची विचारणा केली असता कर्मचार्‍यांनी कॅमेरा अनेक दिवसांपासून बंद असून माहीत नसल्याचे सांगितले. यावरुन जिल्हा परिषद प्रशासन कितपत गंभीर आहे याचा अंदाज आला. एकडे स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद 57 लाख खर्च करीत असतांना दुसरीकडे मात्र आवो जावो घर तुम्हारा, असे चोरांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

First Published on: May 3, 2023 2:02 PM
Exit mobile version