आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक

आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) अटक केली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेला राजेवाडी (ता.नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक पंकज रमेश दशपुते यांचा शोध पथक घेत आहेत.ठाणे विभागाच्या पोलीसांनी नाशिकमध्ये येवून ही कारवाई केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षण संस्थेच्या शाळांना 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्यासाठी एकूण 9 लाख रुपयांची लाच मागितली होती. यात तडजोड करत 8 लाख रुपयांवर देण्याचे मान्य केले. शिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांनी यासंदर्भात कारचालक येवले यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवार (दि.10) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास 8 लाख रुपये स्विकारताना येवले यास ताब्यात घेण्यात आले.

First Published on: August 10, 2021 10:02 PM
Exit mobile version