जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत सदस्यांची ‘बोलती बंद’

जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत सदस्यांची ‘बोलती बंद’

नाशिक : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (दि.3)सभापतींची बोलती बंद करण्याचा प्रकार घडल्याने सद्स्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे या बोलत असताना त्यांचा माईक म्यूट केल्यामुळे त्यांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच कृषी सभापती संजय बनकर यांनीही या प्रकारनाचे गांभीर्य ओळखून प्रशासनास जाब विचारला.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा ऑनलाईन पार पडली. बैठकीत शिक्षण विभागावर चर्चा सुरू असताना, सभापती दराडे मुद्दे मांडत होत्या. मात्र, त्याचेवळी दराडे यांचा माईक प्रशासनाकडून बंद करण्यात आला. ही बाब सभापती दराडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट, सभापती बनकर यांना फोन करून ही बाब सांगितली. त्यानंतर प्रशासनाने दराडे यांचा माईक सुरू केला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भाग घेत प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. बैठकीत आरोग्य विभागाचा आढाव्यात कोरोनाचा आढावा पदाधिकार्‍यांनी घेतला. वाढत्या फाईल पेंडन्सीचा मुद्दा महेंद्र काले यांनी उपस्थित केला. यावेळी सभापती अश्विनी आहेर, सुशिला मेंगाळ, समिती सदस्य भास्कर गावित, महेंद्र काले, सविता पवार, छाया गोतत्रणे, यतिन कदम, किरण थोरे सहभागी झाले होते.

….
डॉ. कुंभार्डे यांचा बहिष्कार
प्रशासनाकडून वेळेत माहिती मिळत नाही तसेच ऑनलाईन सभेच्या निषेध म्हणून भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.

First Published on: July 3, 2020 9:44 PM
Exit mobile version