झेडपी : १९८ दिव्यांग कर्मचारी यूडीआयडी कार्ड वीना

झेडपी : १९८ दिव्यांग कर्मचारी यूडीआयडी कार्ड वीना

जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्याने खळबळ उडाली होती. आता जिल्हा परिषद प्रशासन संपूर्ण विभागनिहाय प्रमाणपत्र पडताळणी करत आहेत त्यात जिल्हा परिषदेत ६०९ पैकी ४११ दिव्यांग कर्मचार्‍यांकडे युडी आयडी कार्ड आहेत. १९८ जणांकडे यूडीआय डी कार्ड नसल्याचे समोर आले आहेत. १९ एप्रिल २०२४ पर्यंत यूडीआय डी कार्ड सादर करावे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषद काही महिन्यांपूर्वी दिंडोरी येथील ग्रामसेवक अधिकारी संजय पाटील यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण समोर आले होते. याबाबत चौकशी केली असता हे बनावट आढळले आहेत. त्यामुळे सिन्नर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासन अलर्ट वर झाले असून, त्यांनी जिल्हा परिषदेचे दिव्यांंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम हाती घेतले.

त्यात १९८ कर्मचार्‍यांकडे यूडीआयडी कार्ड नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे १९ एप्रिलपर्यंत हे यूडीआयडी कार्ड सादर करावे अशा सूचना प्रशासन प्रमुख मित्तल यांनी दिलेल्या
आहेत.

जिल्हा परिषद एकूण मंजूर पदे : १८ हजार ६६८
जिल्हा परिषद एकूण कर्मचारी : १५ हजार११३
दिव्यांग प्रमाणपत्र असलेले कर्मचारी : ६०९
यूडीआयडी कार्ड असलेले कर्मचारी : ४११
यूडीआयडी कार्ड नसलेले कर्मचारी : २९८

First Published on: April 17, 2024 1:38 PM
Exit mobile version