‘बच्चू कडू मजबूर झालेत, त्यांची अशी अवस्था…’; राष्ट्रवादीचा टोला

‘बच्चू कडू मजबूर झालेत, त्यांची अशी अवस्था…’; राष्ट्रवादीचा टोला

A letter from Sharad Pawar and inclusion of 52 castes in OBC Bacchu Kadu said directly true OBC leader

आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आता यावरुन राष्ट्रवादीने टोला लगावला आहे. बच्चू कडू हे मजबूर आहेत, असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. ( Nationalist Youth Congress Working President Maharashtra Pradesh Spokesperson Suraj Chavan tweeted and criticized Bacchu Kadu  )

बच्चू कडू ‘मजबूर’

राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी ट्वीट करत बच्चू कडू यांना टोला लगावला आहे. ट्वीट करत त्यांनी म्हटलंय की, शिंदे-फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा नुसता”दर्जा”देऊन दुधाची तहान ताकावर भागवली. नेहमी मजबूत असणारे बच्चू भाऊ कडू खोक्याच्या ओझ्याने “मजबूर”झाले आहेत …
छुपाना भी नहीं आता
बताना भी नहीं आता
त्यांची अशी अवस्था झाली आहे. असा टोला बच्चू कडूंना लगावला आहे.

मंत्रीपदाचा दर्जा देत केली नाराजी दूर? 

आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

बच्चू कडू यांनी अनेकदा जाहीरपणे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वक्तव्य केलं होतं. मंत्रीपदाबाबत ते उत्सुक असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता त्यांची हीच नाराजी दूर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांना दिव्यांग कल्याण खात्याचं अध्यक्षपद देत, त्याला मंत्रि‍पदाचा दर्जा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार नाही हे निश्चित झालं.

( हेही वाचा : कोरोना विषाणू कोण? हे जनता दाखवतेयं; ‘सामना’तील टीकेचा उदय सामंतांनी घेतला समाचार )

काय म्हणाले होते बच्चू कडू?

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने जनतेची कामं खोळंबली असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते. मंत्रिमंडळ विस्तार हा मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला व्हायला हवा. एकाच मंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. मोठी अडचण निर्माण होत आहे. कामाला गती मिळत नाही. जनतेची कामे वेगाने करायची असतील तर विस्तार हा महत्त्वाचा आहे. जनतेच्या हिशोबाने विस्तार होणं गरजेचं आहे. येत्या निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो.

तसचं, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यात तुम्ही कोणतं खातं मागितलं आहे, असं विचारलं असता दिव्यांग मंत्रालय मागितलं असून ते मिळेल असं वाटतयं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शब्द दिला असल्याचेही बच्चू कडू याआधी प्रतिक्रिया देताना म्हणाले होते.

First Published on: May 25, 2023 9:55 AM
Exit mobile version