१२ आमदारांच्या नियुक्तीवर राज्यपाल लवकरच निर्णय करतील, नवाब मलिक यांचा विश्वास

१२ आमदारांच्या नियुक्तीवर राज्यपाल लवकरच निर्णय करतील, नवाब मलिक यांचा विश्वास

१२ आमदारांच्या नियुक्तीवर राज्यपाल लवकरच निर्णय करतील, नवाब मलिक यांचा विश्वास

विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या (12 MLA) नेमणुकीबाबत दाखल याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने  राज्यपालांनी राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे,असे सूचित केले आहे. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर  घेतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार विधान परिषदेवर १२ आमदारांची नावे निश्चित करून तसा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. त्याला आता ९ महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांनी किती वेळेत निर्णय घ्यावा यासंदर्भात कायद्यात तरतूद नाही. मात्र राज्य मंत्रिमंडळात एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्याचे काम राज्यपालांचे असते. ते त्यांना बंधनकारक असून कायद्यात तरतूद असल्याचे मलिक म्हणाले.

मात्र, असे असताना तरतूद नसल्याचा गैरफायदा घेत राज्यपाल अनिश्चित काळासाठी १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवत आहेत आणि हे योग्य नाही, अशी नाराजीही नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने सूचित केल्यामुळे राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील. दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे हे न्यायालयाचे म्हणणे योग्य आहे. परंतु राज्यपाल संविधानिक पद आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव नसला पाहिजे. राज्यपाल हे राजकीय पक्षाचे व्यक्ती नसतात याचे भान राज्यपालांनी ठेवले पाहिजे, असेही नवाब मलिक स्पष्ट यांनी केले.

राष्ट्रवादी हा शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद बोकाळल्याचा आरोप केला होता. नवाब मलि मलिक यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना हा आरोप खोडून काढला.

या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली. त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे. जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसल्यानेच ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोलाही  नवाब मलिक यांनी लगावला.

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समतामूलक समाज घडवण्याचे काम केले हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे.त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य हे अज्ञानातून झाले असावे, असेही नवाब मलिक म्हणाले.

First Published on: August 13, 2021 9:47 PM
Exit mobile version