ड्रग्ज प्रकरणात माझ्या जावयासंदर्भातही बातम्या पेरल्या होत्या – नवाब मलिक

ड्रग्ज प्रकरणात माझ्या जावयासंदर्भातही बातम्या पेरल्या होत्या – नवाब मलिक

मलिकांना मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाचा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या त्यांच्या जावयावर भाष्य केलं. ड्रग्ज प्रकरणात माझ्या जावयासंदर्भात बातम्या पेरल्या होत्या, असं मलिक म्हणाले. तसंच, जावयाला जामीन मिळाला असल्याची माहिती देखील मलिक यांनी दिली. मलिक यांचे जावई समीर खान यांना १३ जानेवारीला एनसीबीने अटक केली होती.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत क्रुझ ड्रग्ज प्रकरणात मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी त्यांनी त्यांचा जावई समीर खान यांच्याविषयी भाष्य केलं. “१२ जानेवारीला माझ्या जावयाला एक समन्स आलं. १३ जानेवारीला फोन करुन चौकशीला बोलावलं. पावणे दहावाजता ते दाखल झाले. तेव्हा पण कॅमेरे लावले गेले होते. त्यावेळी बातम्या पेरण्यात आल्या. मला तेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा मी सांगितलं कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. मग तो माझा जावई असूद्यात, अधिकारी किंवा पत्रकार असुद्यात. देशातील न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे. दहा दिवसांपूर्वी माझ्या जावयाला जामीन मिळाला आहे,” असं मलिक यांनी सांगितलं.

“तुम्ही बातम्या लावल्या होत्या की मंत्र्यांचा जावयाला अटक करण्यात आली. तुमची जबाबदारी होती की तुम्ही आरोपपत्र बघायला पाहिजे होतं. आरोप लावण्यात आला होता २०० किलो गांजाचा…दुसऱ्या व्यक्तीकडे तो सापडला होता. आरोपपत्र बघा त्यात काय आहे. जामीनासाठी जो युक्तीवाद करण्यात आला त्याची ऑर्डर काढण्याचा प्रयत्न करा. मी आज त्यावर खुलासा करायला आलेलो नाही,” असं मलिक म्हणाले.

 

First Published on: October 6, 2021 3:37 PM
Exit mobile version