एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला, काय आहे वानखेडेंची कारकीर्द?

एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपला, काय आहे वानखेडेंची कारकीर्द?

संग्रहित छायाचित्र

एनसीबी मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपला आहे. समीर वानखेडेंना सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु काल (शुक्रवार) वानखेडे यांचा कार्यकाळ संपला आहे. एनसीबीकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपसाचे नेतृत्त्व समीर वानखेडे यांनी केले आहे. त्यानंतर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. या प्रकरणी किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

काय आहे वानखेडेंची कारकीर्द?

ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत त्यांनी ९६ जणांना अटक केली आहे. तसेच २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०२१ मध्ये त्यांनी २३४ लोकांना अटक असून ११७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २००८ मध्ये समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. निवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी ज्ञानदेव वानखेडे यांचे ते पुत्र आहेत. वानखेडेंनी जवळपास १७९१ किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त केले आहेत. तर ११ कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेवर धाड टाकली आहे.

समीवर वानखे़डे एनसीबीमध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिटचे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे अतिरिक्त एसपी म्हणून काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी कस्टम्स विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्ज प्रकरण त्यांनी हाती घेतले होते. या प्रकरणात त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून ते थेट ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर येणाऱ्या हाय-प्रोफाइल बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली. तर ३३ हून अधिक जणांना अटकही केली होती.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबई किनारपट्टीवरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकून कथितरित्या ड्रग्ज जप्त केले आहेत.एनसीबीने छापादरम्यान वापरलेल्या स्वतंत्र साक्षीदारांच्या ओळखपत्रांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर आरोप केले. बनावट जात प्रमाणपत्र दाखविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर नवाब मलिक आणि वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेला सुरूवात झाली होती.


हेही वाचा : आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी द्यावा लागणार एक्स्ट्रा चार्ज


 

First Published on: January 1, 2022 10:02 AM
Exit mobile version