विरोधकांचे हात-पाय तोडा, अरे काय तुझ्या बापाच्या…; अजित पवारांचा शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल

विरोधकांचे हात-पाय तोडा, अरे काय तुझ्या बापाच्या…; अजित पवारांचा शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल

हात तोडता आला नाही तर पाय तोडा, अशा शब्दांत आमदार प्रकाश सुर्वे यांनी चिथावणीखोर भाषण केल होते. तसेच, दादर-प्रभादेवी विभागातील शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटातील आमदारांच्या एकंदरीत वर्तनावर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. “आमदाराने सांगितले विरोधकांचे हात-पाय तोडा, कुणी तुमच्यामागे आले तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचे आहे का? हे तुम्ही कसं बोलू शकता?”, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, “कोण चुकीचं वागत असेल, तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. पण तसं होत नाही. गोळीबार केला जातो. त्यांचे लोक शिवीगाळ करतात”, असेही अजित पवार यांनी म्हटले. (Ncp Ajit Pawar Slams Cm Eknath Shinde group mla)

बीडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी राज्याच्या सत्तेवर असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना धारेवर धरले. यावेळी “कोण चुकीचे वागत असेल, तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. पण तसं होत नाही. गोळीबार केला जातो. त्यांचे लोक शिवीगाळ करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? काही तर आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या मेळाव्यात आमदारानं सांगितलं विरोधकांचे हात-पाय तोडा. कुणी तुमच्यामागे आले तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का? हे तुम्ही कसं बोलू शकता? इतर राज्यांमध्ये तशा घटना घडतात. पण महाराष्ट्राला त्या पातळीवर न्यायचंय का?” अस सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे”, असे सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

”राज्यभरात झालेल्या पावसामुळे अतीवृष्टी निर्माण झाली असून, राज्यात मोठे नुकसान झाले आहे. तिथल्या शेतकऱ्याला पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. त्याचे उत्तर देत नाहीत. त्याचे उत्तर द्या आधी. सत्तेची मस्ती, नशा आणि धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये आहे. हे या सरकारने लक्षात घ्यायला हवे. आम्हीही लक्षात ठेवतो. आम्हीही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. पण काय पद्धतीचे राजकारण सुरू आहे. तुम्ही सांगितले होते लगेच पैसे देतो. दिले का पैसे?” असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला.

“गेल्या तीन महिन्यांत कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईत गोळीबार करत आहेत. सरकारमधले आमदारच गोळीबार करत असतील तर जनतेनं न्याय मागायचा कुणाकडे? हे तर आक्रितच झालं”, असेही अजित पवार यांनी म्हटले.


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

First Published on: September 17, 2022 7:08 PM
Exit mobile version