घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Subscribe

पुण्यातील पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत "मोदी ओबीसी नाहीत, हे आम्ही देशासमोर आणू. आपला देश, देशाच संविधान धोक्यात आलं आहे'', असे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत, त्यांनी जात खोटी सांगितली, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, “ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. परंतु, आडनावावरुन जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळे मोदी हे ओबीसी नाहीत”, असेही नाना पटोले यांनी म्हटले. (Prime Minister Narendra Modi is not an OBC A serious accusation by Nana Patole)

पुण्यातील पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत “मोदी ओबीसी नाहीत, हे आम्ही देशासमोर आणू. आपला देश, देशाच संविधान धोक्यात आलं आहे”, असे म्हटले. तसेच, ‘भाजप त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करत आहे’ असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत, आम्ही ते उघड करणार आहोत, असे मोठं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, “फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेणारे सगळे मोदी आणि शाहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील तरुण जनतेचे काहीही देणेघेणे नाही. मुख्यमंत्र्यांबाबत काही न बोललेलेच बरे. सध्याचे मुख्यमंत्री नाचगाण्यात व्यस्त आहे”, असे नाना पटोले यांनी म्हटले.

- Advertisement -

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यांनी काय काय गुजरातला नेलं याची यादी द्यावी. मात्र तेच फडणवीस महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेण्याच्या गोष्टी करतात. राधाकृष्ण विखे पाटील देखील स्वत: केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये गेले”, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

“देशात महागाई वाढली आहे. भ्रष्टाचारदेखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याकडे भाजपचे लक्ष नाही. भाजप आणि मोदी हे जाती-धर्माचे राजकारण करतात. त्यात फूट पाडण्याचे काम करत आहेत. ईडी, सीबीआय आणि प्रसारमाध्यमांचा गैरवापर करुन देशाचे संविधान मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी देशात भारत जोडो यात्रा सुरु केली आहे”, असेही नाना पटोले यांनी म्हटले.


हेही वाचा – मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भात यलो अलर्ट जारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -