राष्ट्रवादीला खिंडार; सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय करणार भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीला खिंडार; सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय करणार भाजपात प्रवेश

NCP Ex MLA Ashok Tekawade to join BJP shock to Supriya Sule

राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यांच निश्चित झालं आहे. पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. माजी आमदार टेकवडे हे 2004 ते 2009 या काळात पुरंदरमधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा पुरंदरमध्ये यश आलं नाही. टेकवडे हे लवकरच कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. टेकवडे यांच्या पक्षप्रवेशाने पुरंदर राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ( NCP Ex MLA Ahsok Tekawade to join BJP shock to Supriya Sule )

अशोक टेकवडे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असं वाटत नव्हतं. आज ना उद्या ते पत्र सोडतील अशी पुरंदरमध्ये दबक्या आवााजात चर्चा होती. अखेर या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठं बळ मिळालं आहे. भाजपने मिशन बारामती सुरु केलं आहे. बारामतीत पवार कुटुंबाला तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. या मिशन बारामतीचा भाग म्हणूनच टेकवडे यांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखील वाढणार असल्याचे संकेत आहेत.

( हेही वाचा: महाराष्ट्रात सुरू असलेल्या दंगली हा भाजपचा लोकसभेचा प्लॅन; खैरेंचा गंभीर आरोप )

पत्राद्वारे केली होती तक्रार

अशोक टेकवडे हे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. तशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यांनी गेल्या महिन्यात तसं पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. टेकवडे यांनी जिल्हाध्यक्षांना एक पक्ष लिहिलं होतं. त्यात त्यांनी पुरंदर तालुक्याध्यक्षांची तक्रार केली होची. तालुकाध्यक्षांवर टेकवडे यांनी या पत्रातून गंभीर आरोप केले होते, तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणीही केली होती. याशिवाय राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही. तो पदाधिकाऱ्यांचा पक्ष झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. मात्र, या पत्रावर काहीच कारवाई न झाल्याने टेकवडे दुखावले गेले होते.

First Published on: May 15, 2023 12:35 PM
Exit mobile version