काही नावं टाळता आली असती, मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया…

काही नावं टाळता आली असती, मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची प्रतिक्रिया…

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून शिंदे गट आणि भाजपातील एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी काही नावं टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अजित पवार यांनी दिली आहे.

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उशिरा का होईना एकदाचा शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. पण ज्यांना अजून क्लीन चिट मिळाली नाही. अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले.

तब्बल ३९ दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांचे नाव समोर आले होते. तर संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचा मान मिळाला. यावरून अजित पवारांनी खोचक टीका केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे अजित पवार यांच्यासह भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


हेही वाचा : ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग करावा; जयंत पाटलांची खोचक


 

First Published on: August 9, 2022 3:39 PM
Exit mobile version