ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग करावा; जयंत पाटलांची खोचक टीका

Allegation against Sharad Pawar out of fear of NCP becoming powerful Jayant Patil claim

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. तब्बल ३९ दिवसांनंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा राज्यपालांच्या राजदरबारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही स्त्रीला स्थान देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांनी हिंदुत्वासाठी त्याग करावा, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागे हिंदुत्वासाठी सर्व केले, असं बंडखोरांनी म्हटले होते. शिवसेनेविरोधात बंडखोरीत चाळीस ते पन्नास शिवसेना आणि अपक्ष आमदार होते. त्यांनी बंडखोरी कशासाठी केली हे लपुन राहिलेले नाहीये. यामध्ये जे मंत्री होते. त्यांना अधिक चांगले खाते हवे होते. तसेच जे आमदार होते, त्यांना मंत्री व्हायचे होते. जवळपास प्रत्येकालाच मंत्री व्हायचे होते. त्यांची ही आकांक्षी लपुन राहिलेली नाहीये. मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आणि अनेक आमदारांना संधी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे त्यांनी नाराज न होता हिंदुत्वासाठी त्याग करावा, असं जयंत पाटील म्हणाले.

मंत्रिमंडळात संजय राठोड यांच्यासह अब्दुल सत्तार या वादग्रस्त मंत्र्यांना सहभागी केल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी पाटील म्हणाले की, कोणाला मंत्री कारावे हा मुख्यमंत्र्यांचा चॉईस आहे. याचा दुसरा अर्थ आपले सहकारी कसे असावेत, हा चॉईस मुख्यमंत्र्यांचा आहे.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतही विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.


हेही वाचा : मंत्रीपद हा आमचा हक्क तो आम्ही मिळवणारच – बच्चू कडू