राम नवमी साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

राम नवमी साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

संपूर्ण देशभरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. भाविकांनी देखील राम मंदिरात गर्दी करत अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि प्रभात फेरी काढली. अयोध्येत मोठा उत्साह साजरा करण्यात आला. दरम्यान, रामनवमी साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदु जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे… याला म्हणतात , “हंस चुगेगा दाना तिनकाlकौआ मोती खायेगा ll”, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या मनसेच्या पाडव्या मेळाव्यात हिंदू बांधवांनी रामनवमी जोरात साजरी करावी, असं आवाहन केलं होतं. एकदा राज्य माझ्या हातात द्या, मी सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावे आणि टपली मारून जावे, हे चालणार नाही. माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, यंदा रामनवमी जोरात साजरी करा, असं राज ठाकरे म्हणाले होते. यावरूनच आता अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.


हेही वाचा : हेट स्पिच प्रकरण : निलंबित भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून FIR


 

First Published on: March 30, 2023 3:10 PM
Exit mobile version