रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल

रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल

रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल

रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते तर त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं होतं, अशी माहिती दिली. यामुळे खळबळ उडाली आहे. यावरुन आता नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

रश्मी शुक्लांच्या वकीलांनी न्यायालयात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचं सांगितलं. रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंगसाठी तत्कालिन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल करत फोन टॅप दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असंही नवाब मलिक म्हणाले.

पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना त्या काळातील खासदार, नेते असतील यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे. ज्या पध्दतीने त्या त्यांची ट्रान्सफर झालेली सांगत आहेत. मात्र त्यांची ट्रान्सफर झालेली नाही असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा – सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग; रश्मी शुक्लांचा गौप्यस्फोट


 

First Published on: July 29, 2021 12:05 PM
Exit mobile version