आमदाराच लग्न पडलं महागात; कोरोना पॉझिटिव्ह भुजबळांमुळे शरद पवार क्वारंटाईन

आमदाराच लग्न पडलं महागात; कोरोना पॉझिटिव्ह भुजबळांमुळे शरद पवार क्वारंटाईन

आमदाराच लग्न पडलं महागात; कोरोना पॉझिटिव्ह भुजबळांमुळे शरद पवार क्वारंटाईन

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढू लागला आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे राजकीय नेत्यांनाच गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी आमदार सरोज आहेर यांच्या मुलाचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील उपस्थिती लावली होती. दरम्यान, आज छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनीच कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

लग्नात हजारोंची गर्दी

आमदार सरोज आहेर यांचा नाशिक शहरात विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळींनी उपस्थिती लावली होती. तर बहुतांश नागरिकांनी मास्क देखील घातले नव्हते. तसेच मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे देखील पाहण्यास मिळाले. त्यामुळे लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना वेगळा न्याय, असा प्रश्न आता उपस्थितांकडून विचारण्यात येत आहे.

भुजबळांनी घेतल्या अनेक बैठका

मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिवसभरात अनेक बैठका घेतल्या होत्या. तसेच ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हॅलिपॅडवरुन आणण्यासाठी देखील गेले होते. तसेच त्यांना सोडण्यासाठीही गेले होते. त्यामुळे दिवसभर शरद पवार भुजबळांच्या संपर्कात होते. त्यामुळे आता शरद पवार यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तसेच पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर येत्या १ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.


हेही वाचा – मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण


 

First Published on: February 22, 2021 10:59 AM
Exit mobile version