ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर; पवारांनी फेटाळला भाजपचा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर; पवारांनी फेटाळला भाजपचा दावा

मुंबई – महाराष्ट्रातील काही जिल्हयात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी ला 277 जागा मिळाल्या असून भाजप – शिंदे गटाला 210 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये 608 जागांपैकी 173 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर आहे तर भाजप – 168, कॉंग्रेस – 84, शिंदे गट – 42 आणि शिवसेना यांची अधिकृत आकडेवारी आलेली नाही अशी माहिती शरद पवार यांनी देतानाच राष्ट्रवादीच्या तरुणांचे अभिनंदन केले. आम्हाला माहीत असलेल्या आमच्या जागा आम्ही सांगितल्या आहेत आता त्यांना वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर त्या आनंदात त्यांनी रहावं आम्हाला त्याची चिंता नाही असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

पत्राचाळ प्रकरणात माझी किंवा कुणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीला आम्ही तयार आहोत. चार – आठ – दहा दिवसात म्हणजे जेवढ्या लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा मात्र चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे त्यात वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणार्‍यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्यसरकारने जाहीर करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सरकारला दिले.

ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळचे इतिवृत्त ज्या अधिकार्‍याने सही केली ते माध्यमांना देत असून त्यानंतर जे कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे त्याच्यात माझे नाव आहे असे माध्यमातून बोलले जात आहे त्या आरोपपत्रात नक्की काय आहे ते त्यांच्या पान नंबर सातवर आणि आठवर असेल त्याची कॉपी तुम्हाला दिली आहे. म्हणजे जी चौकशी करणारी एजन्सी आहे ती कोर्टात काय मांडते आणि राज्यसरकारची त्यावेळी जी चर्चा झाली त्याची टिप्पणी ते काय म्हणतात त्या दोन्ही कॉपी याची स्वच्छ भूमिका सांगितली आहे असेही शरद पवार म्हणाले.

राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यात काही प्रश्नांवर लोकांमध्ये अस्वस्थता आहे. राज्यसरकारने जे काही निर्णय बदलले आहेत हे कारण आहे. कोरोना काळामध्ये काही मुलं किंवा पालक मृत्यूमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. त्यामध्ये अडीच हजार इतके अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ते अनुदान आताच्या सरकारने स्थगित केले आहे ही माहिती खरी असेल तर राज्यसरकारने लवकरच हा निर्णय लागू करुन अनुदान दिले पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली.

यावेळी शरद पवार यांनी कोरोना काळात जे नियम लावण्यात आले होते यामध्ये आई किंवा वडील यांच्यापैकी एकच हयात आहेत अशी जी मुलं आहेत जी कोरोना काळात मृत्यूमुखी पडली त्यांची संख्या २० हजार आहे आणि ज्यांचे आई- वडील मृत्यूमुखी पडले अशा मुलांची संख्या 800 आहे. या सर्व पालकांकडे किंवा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीचा व समंजसपणाचा सरकारचा हवा. आज अशाप्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या बाहेर झाली त्या – त्या राज्यसरकारने अनुदान दिले आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेश – 4 हजार, कर्नाटक – 3500, उत्तराखंड – 3500, मध्यप्रदेश – 5 हजार, दिल्ली – 2500, हिमाचल प्रदेश – 2500, तामिळनाडू – 3 हजार, राजस्थान – 2 हजार, महाराष्ट्र 1 हजार 125 होते त्यामध्ये माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी वाढ करत ते अनुदान अडीच हजार रुपये केले होते. मात्र ही योजना व याला तोंड देणे या सरकारच्या कृतीमध्ये आले नाही त्यामुळे इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अशा अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील कुटुंबाची अवस्था गंभीर आहे याकडे राज्यसरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणीही शरद पवार यांनी केली.

फॉक्सकॉनबाबत मला वेगळं मत मांडायचं नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता त्यासाठी जागाही ठरली होती. एका नव्या प्रकल्पाला संधी मिळाली असती त्यामुळे हा प्रकल्प इथे होणे गरजेचे होते मात्र नाही झाला. तो गुजरातला गेला आता हा प्रकल्प देशात कुठेतरी होतोय म्हणून मी विरोधाला विरोधी भूमिका घेणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच राज्यसरकारने गुंतवणूकीचे वातावरण तयार केले पाहिजे. राज्यात काम करत असताना त्यावेळी दोन तास गुंतवणूक करायला येणाऱ्या लोकांना एक विश्वास द्यायला लागायचा त्यावेळी गुंतवणूक क्लायमेंट महाराष्ट्रात चांगले होते त्याला धक्का बसला असेल परंतु इथे राजकीय भूमिका न घेता सगळ्यांनी राज्याच्या हिताच्या गुंतवणूकीचे वातावरण तयार करायला हातभार लावावा असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

आज इंडियन एक्स्प्रेसमध्ये पहिल्या पानावर एनडीएच्या कारकीर्दीत ईडीने किती जणांवर कारवाया केल्या. कोणत्या राजकीय पक्षांवर केल्या हे सर्वांना मार्गदर्शक ठरणारे वृत्त आले आहे. या कालावधीत समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत त्या निवडणूकीनंतरच्या आहेत. त्याबद्दलची शंका दूर करण्यासाठी अन्य पक्षांच्या लोकांवर खटले भरायचे, चौकशी लावायची, अटक करायची या सगळ्या गोष्टी महत्वाचा कार्यक्रम म्हणून घेतल्या जात आहेत असा थेट आरोप नाव न घेता करतानाच त्याला राजकीयदृष्टया आम्ही तोंड देणार आहोत असे स्पष्टपणे शरद पवार यांनी जाहीर केले.

राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांचे असतात. त्यांनी राज्याचा विचार करायला हवा. त्यांना स्वतःला माहित आहे अनेकदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी भूमिका मांडली. त्यामुळे याच्यात वाद वाढवू न देण्याची जबाबदारी ही राज्यप्रमुखाची आहे. आता बीकेसीमध्ये मेळावा घ्यायला जागा मिळाली आहे याचा आनंद आहे. त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. त्यानंतर जी एक परंपरा आहे त्या परंपरेसंदर्भात पहिल्यांदा मागणी उध्दव ठाकरे यांनी केली असेल तर त्या मागणीवर विलंब लावणे योग्य नाही हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा अशी अपेक्षा शरद पवार यांनी दसरा मेळावा वादाबाबत व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारने सण बंद केले होते असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात निर्णय घेतला परंतु देशाच्या पंतप्रधानांनी देशाला आवाहन केले त्या काळात हे सण, उत्सव, सभा, संमेलन, लग्न या सगळ्या गोष्टींवर मर्यादा लावण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय धोरण पंतप्रधानांनी मांडले ते महाराष्ट्राने पाळले याची जाण जाणकारांना असली पाहिजे त्यामुळे ते सणांवर बंदी होते असे काही म्हणोत पंतप्रधानांचा निर्णय योग्य होता असेही शरद पवार म्हणाले.


चौकशी करा, पण आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही स्पष्ट करा : शरद पवार

First Published on: September 21, 2022 5:43 PM
Exit mobile version