महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी! एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी! एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई – राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ (NDRF) व एसडीआरएफच्या (SDRF) १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात आहेत.

नांदेड- १, गडचिरोली – १ अशी एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१६ गावे प्रभावित झाली आहेत. राज्यात विविध ठिकाणी ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११९ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर २३२ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.

हेही वाचा – देशाच्या ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला रेड अलर्ट जारी

महाराष्ट्राच्या काही भागात रेड अलर्ट 

IMD ने पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सातारा यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. IMD ने पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया आणि वाशीमसह महाराष्ट्रातील काही भागांमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

First Published on: August 9, 2022 8:47 PM
Exit mobile version