देशात 18 हजार 53 नवे कोरोना रुग्ण, तर 1 लाख 23 हजार सक्रिय रुग्ण

देशात 18 हजार 53 नवे कोरोना रुग्ण, तर 1 लाख 23 हजार सक्रिय रुग्ण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात गुरुवारी दिवसभरात 18 हजार 53 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 35 लाख 73 हजार 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली. (new 18053 corona patients in india)

दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्येच्या आलेखात चढ-उतार होत आहेत. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.28 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.53 टक्के आहे. तसेच, देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 5.44 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, आहे. सध्या देशात 1 लाख 23 हजार 535 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

11 हजार 790 सक्रीय रुग्ण

मंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात सध्या 11 हजार 790 सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे, नागपूरमध्ये आहेत. मुंबईमध्ये 3 हजार 818 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1 हजार 219 सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यात 2 हजार 417 सक्रीय रुग्ण आहेत.


हेही वाचा – तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी नाहीत, गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना सुनावले

First Published on: August 12, 2022 11:53 AM
Exit mobile version