नव्या कळवा पुलावरील चौथी मार्गिका बुधवारपासून वाहतुकीसाठी खुली; महापालिका आयुक्तांची माहिती

नव्या कळवा पुलावरील चौथी मार्गिका बुधवारपासून वाहतुकीसाठी खुली; महापालिका आयुक्तांची माहिती

ठाणे : नवीन कळवा पुलाच्या ठाणे कारागृहाच्या बाजूकडील मार्गिका ३० नोव्हेंबर २०२२ म्हणजे उद्यापासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. नवीन कळवा पुलाची ही चौथी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

कळवा खाडीवरील नवीन पुलाच्या पोलीस आयुक्तालय कार्यालय ते कळवा चौक, बेलापूर रोडवरील मार्गिका यांचा लोकार्पण सोहळा १३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाणे कारागृहाजवळील मार्गिका १ डिसेंबर २०२२ रोजी सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणेच सदर मार्गिका एक दिवस पूर्वीच म्हणजेच ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.

ठाणे कारागृहाच्या बाजूकडील ही मार्गिका कळवा चौक आणि बेलापूर मार्गावर उतरणार आहे. ही मार्गिका वाहनांसाठी सुरू झाल्यावर ठाणे बाजूकडील चौकामध्ये तसेच कळवा येथील शिवाजी चौक या दोन्ही ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे.

साकेतकडील मार्गिका ३१ मार्च होईल सुरू

कळवा पुलावरील चौथ्या मार्गिकेचे काम हे वेळेत पूर्ण झाले असून ही मार्गिका उद्यापासून सुरू होत आहे. या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटणार असून वेळेची बचत होणार आहे. ही मार्गिका वाहतुकीस खुली केल्यानंतर कळवा चौक परिसर, ठाण्याहून बेलापूर, नवीमुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच साकेतकडील मार्गिकेचे कामही युद्ध पातळीवर सुरू असून ही मार्गिका ३१ मार्च २०२३ रोजी सुरू करण्यात येईल असेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.


…अन् मंदिराला चित्रा वाघांनी जोडले सावरकरांचे नाव; राष्ट्रवादीने सांगितले माफी मागा


First Published on: November 29, 2022 8:21 PM
Exit mobile version