घरमहाराष्ट्र...अन् मंदिराला चित्रा वाघांनी जोडले सावरकरांचे नाव; राष्ट्रवादीने सांगितले माफी मागा

…अन् मंदिराला चित्रा वाघांनी जोडले सावरकरांचे नाव; राष्ट्रवादीने सांगितले माफी मागा

Subscribe

चित्रा वाघ यांनी भागोजीशेठ कीर यांचे कार्य दुर्लक्षित करून सावरकरांच्या नावावर ज्या गोष्टी नाहीत त्या खपवू नयेत.

रत्नागिरीत असलेले पतितपावन मंदिर भागोजीशेठ कीर यांनी बांधूनही त्यांचे नाव न घेता या मंदिरासंदर्भांत खोटी माहिती देताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हे मंदिर बांधले आहे असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटले आहे. याविरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक झाली असून चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुन्हा रत्नागिरीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीने चित्रा वाघ यांना दिला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विटखाली अनेक जण त्यांनी खोटे ट्विट केल्याचा आरोप केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतेच रत्नागिरीमधील प्रसिद्ध पतित पावन मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी काढलेले काही फोटो त्यांनी ट्विट केले आहेत. हे मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधले असा दावा चित्रा वाघ यांनी ट्विटमधून केला. यावरूनच राष्ट्रवादी आक्रमक झाली झाली आहे. पतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख तरी चित्रा वाघ यांनी वाचायला हवा होता, असं म्हणत चित्रा वाघ यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी नेमकं काय म्हणाली

या सर्व प्रकरणी राष्ट्रवादीन म्हटले आहे, भागोजीशेठ कीर हे मोठे दानशूर होते. त्यांनी मुंबईमध्ये स्वःखर्चाने ९ एकर भूखंड विकत घेऊन हिंदू स्मशानभूमीसाठी सरकारला हे भूखंड दान केले. अनेक शाळा, मंदिरे, गोशाळा, धर्मशाळा बांधून दान केल्या. रत्नागिरीतील हे मंदिरसुद्धा त्यांच्याच पुढाकारातून तयार झाले आहे. त्यामुळे कीर यांचे कार्य दुर्लक्षित करून सावरकरांच्या नावावर खपवू नये, असे आवाहन राष्ट्रवादीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांना दिले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील दानशूरांच्या यादीमध्ये भागोजीशेठ कीर यांचे नाव मोठे आहे. त्यामुळे कीर यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हिंदू महासभेने पतितपावन मंदिरात त्यांच्या हयातीत कीर यांचा पुतळा मध्यभागी उभारण्यात आला होता. त्यामुळे चित्रा वाघ यांनी भागोजीशेठ कीर यांचे कार्य दुर्लक्षित करून सावरकरांच्या नावावर ज्या गोष्टी नाहीत त्या खपवू नयेत. त्यांच्या पक्षाकडे जर खरा इतिहास असेल तर सावरकर यांनी समाजकल्याणासाठी एकतरी पाणवठा बांधून दिला असेल तर तो जनतेला दाखवावा, अन्यथा माफी मागावी, अशी मागणी शेट्ये यांनी केली आहे.

२४ फेब्रुवारी १९३१ रोजी भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या विनंतीवरून हे पतितपावन मंदिर बांधून हिंदू धर्मिय जनतेसाठी खुले केले आणि भागेश्वर चरणी अर्पण केले. अशा आशयाचा शिलालेख पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लिहीला गेला असताना सुध्दा हा खरा इतिहास न वाचता चित्रा वाघ यांनी आणि त्यांच्या पक्षाने दिलेला होमवर्क ट्विटरवरून मांडला आणि स्वतःच्या अज्ञानाची मुक्ताफळे उधळली, असा आरोपही रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीने केला आहे.

चित्रा वाघ यांचे ट्विट 

“स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या प्रसिद्ध पतित पावन मंदिरात मनोभावे पूजा केली. प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे भारतातील पहिले मंदिर”. असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -