‘पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच’

‘पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

भाजपबरोबर युती करुन लोकसभा निवडणुकीत युतीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशानंतर आता विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘शिवसेना ही स्वतंत्रबाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा आपल्याला भगवी करून सोडायची आहे. पुढच्या वर्षीच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल, त्यामुळे कामाला लागा‘, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

निर्धाराने कामाला लागूया

शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही ५३ वर्षांची मजल मारु शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी युतीजरुर आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा भगवीकरुन सोडू आणि शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने कामाला लागूया‘!, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या आजच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक सामनामध्ये लिहिलेल्या अग्रलेखात शिवसेनेने हा निर्धार व्यक्त केला आहे.

चळवळ हाच शिवसेनेचा आत्मा

या चळवळी जशा मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, हिंदूंचा स्वाभिमान यासाठी झाल्या त्यापेक्षा या चळवळी जनतेच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर अधिक झाल्या. सुरुवातीच्या काळात महागाईविरोधात लाटणे मोर्चे, पाण्यासाठी हंडा मोर्चे, गहू तांदूळ, तेलासाठी आंदोलने झाली. ती आंदोलने आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होत आहेत. पण त्याच्या जोडीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणीवाटप, चारा छावण्या, अन्नछत्रापर्यंत हे समाजकार्य पोहोचले आहे. शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही ५३ वर्षांची मजल मारु शकलो. तसेच शिवसेनाप्रमुखांनी प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला तो देशाने स्वीकारला आणि हिंदुत्वाचे बीज टाकले तेही या भूमीत तारले.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंसाठी या मतदारसंघाची चाचपणी; विधानसभा युतीसोबत लढवणार

हेही वाचा – विजयानंतरही युतीच्या गोटात चिंतेचे मळभ


 

First Published on: June 19, 2019 9:08 AM
Exit mobile version