घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंसाठी या मतदारसंघाची चाचपणी; विधानसभा युतीसोबत लढवणार

आदित्य ठाकरेंसाठी या मतदारसंघाची चाचपणी; विधानसभा युतीसोबत लढवणार

Subscribe

लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेलं यश पाहाता राज्यात विधान सभा निवडणूक युतीतच लढायची आहे. त्यामुळे युतीत कोणतेही वाद नकोत, असे सांगत विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत दिले. या बैठकीत निवडून आलेल्या जागा तसेच पराभव झालेल्या जागांची कारणमीमांसा करण्यात आली. बैठकीत विधानसभा निवडणुका हे उद्दिष्ट समोर ठेऊन चर्चा करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना नेते आणि लोकसभेतील विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेले यश पाहाता राज्यात विधानसभा निवडणूक युतीतच लढायची आहे. त्यामुळे युतीत कोणतेही वाद नकोत असे सांगत विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत दिले.

- Advertisement -

या बैठकीत निवडून आलेल्या जागा तसेच पराभव झालेल्या जागांची कारणमीमांसा करण्यात आली. बैठकीत विधानसभा निवडणुका हे उद्दिष्ट समोर ठेऊन चर्चा करण्यातआल्याची माहिती मिळत आहे.चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याचेही समजते. इतर पक्षातील बड्या नेत्यांना पक्षात घेण्याबाबत मोर्चेबांधणी करण्याचे ठरले. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी इतर राजकीय पक्षातून आलेल्या नेत्यांच्या पुनर्वसाबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

दरम्यान, युवासेनेच्या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचा ठराव करून, त्यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदार संघ सुरक्षित असल्याने त्यांनी तिथून निवडणूक लढावी, असा ठराव झाल्याचे बोलले जाते. मात्र या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -