शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, आव्हाडांनी केली होती कारवाईची मागणी

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, आव्हाडांनी केली होती कारवाईची मागणी

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाशिकच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाने पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. निखील भामरे नावाच्या तरुणाने आक्षेपार्ह ट्विट केले होते.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात नाशिकच्या निखिल भामरे नावाच्या तरुणाला पोलिसांनी चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाचे नाव निखिल भामरे असून त्याने शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. त्या ट्विटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटचा फोटो शेअर करत तरुणावर कारवाईची मागणी केली होती.

निखील भामरेने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची, आशा आशयाचा मजकूर आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की, केतकी प्रसिद्धीसाठी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा भाबडा प्रयत्न करत आहे. तसेच तिच्यावर कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा : केतकी चितळेला शरद पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं

 

First Published on: May 14, 2022 12:09 PM
Exit mobile version