‘त्या’ बॅग नक्की कोणासाठी? निलेश राणेंचा विनायक राऊतांना सवाल

‘त्या’ बॅग नक्की कोणासाठी? निलेश राणेंचा विनायक राऊतांना सवाल

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर  गंभीर आरोप केले होते. याला उत्तर देताना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला. याबाबत ट्विट नीतेश राणे यांनी केले आहे.

या ट्विटमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊतवर गंभीर आरोप केले, विनायक राऊत निवडणूक असो व कार्यक्रम त्याला ‘बॅग‘ द्याव्या लागतात. कोकणाचं नाव खराब केलं या माणसाने, त्या बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी हे विनायक राऊत यानी स्पष्ट करावे, असा आरोप केला आहे.

विनायक राऊत यांचा आरोप काय होता –

कोल्हापुरात आयोजित मेळाव्पात एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या क्षीरसागर यांच्यावर विनायक राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या वेळी क्षीरसागर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपल्या घरी जेवायला बोलावले होते. त्याचे बिल काँग्रेस नेते सतेज (बंटी) पाटील यांनी भरले, असा आरोप विनायक राऊत यांनी केला होता.

राजेश क्षीरसागर यांचा आरोप काय?  –

विनायक राऊत जेथे जातील त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, त्यांची बॅग तयार ठेवायला लागते, असा गंभीर आरोप माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी केला आहे. पुढे दुसऱ्यांचे ऐकून माझ्यावर ते चुकीचे आरोप करत असतील, तर शिवसेना संपवण्याचे कंत्राट राऊत यांनी घेतले आहे हेच स्पष्ट होते, असा आरोप राजेक्ष क्षीरसागर यांनी केला.

First Published on: July 17, 2022 9:43 AM
Exit mobile version