“मविआ’मध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

“मविआ’मध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | “महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची अवस्था ही दरबातल्या सरदारासारखी झाली आहे”, असा टोला भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला आहे. ‘बाळासाहेबांचा रुबाब आणि उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडींनी काय अवस्था केली’, अशीही टीका नितेश राणेंनी आजच्या पत्रकार परिषदेतून केली आहे.  नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray), ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि कर्नाटकातील काँग्रेसचा झालेल्या विजय आदी मुद्यांवरून हल्लाबोल केला आहे.

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर म्हणाले, “आज तुमची अवस्था ही मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आलेली आहे. तुम्ही दरबारातील एक सरदार म्हणून महाविकास आघाडीत तुमचे स्थान आहे. उद्धव ठाकरेंनी आठवण करायला पाहिजे की, भाजपसोबत असताना त्यांना किती सन्मान मिळायचा. तेव्हा जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे जायाच. आता परिस्थिती खूप बदलली आहे. संजय राऊतासरख्या लोकांच्या नादी लागल्यामुळे तुम्हला त्यांनी आता सोफ्यावर आणणू बसविलेले आहे. कुठे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये मुख्य खुर्चीपासून सुरू झालेला प्रवास हा सोफ्यावर येऊन थांबला आहे. आता आम्हाला भिती वाटू लागली की, तुम्हाला स्टूलवर कधी बसवतात. ही भीत आम्हाला सर्वांना वाटू लागली आहे. जुन्या शिवसैनिकांनी विचार करावा की, बाळासाहेबांचा रुबाब आणि उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडींनी काय अवस्था केली.”

‘मविआ’मध्ये संजय राऊत शकुनी मामा

“संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये शकुनी मामा आणि नारद मुनीचे काम करत आहे. महाविकास आघाडीत भांडणे आणि अहंकार कसा दुखवायचा कामे ते करत आहेत. कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल बोलले जाते. परंतु, संजय राऊत हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूला बसून हा काँग्रेसचा विजय नसून विरोधकांचा विजय आहे. काँग्रेस कशाला विजय साजरा करते. काँग्रेसचा हा अपमान नाना पटोलेंना मान्य आहे का?”, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी

राज्यात दंगली घडवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश नितेश राणे यासंदर्भात बोलताना म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी १३ ऑगस्ट २००४ मध्ये मातोश्रीमध्ये बैठक बोलविली होती. या बैठकीत राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी दंगली घडविण्याचा प्लॅन हा उद्धव ठाकरेंचा आहे का?, यासंदर्भात पोलिसांनी तपास करावा. मातोश्रीमध्ये २००४ मध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील मुस्लिम समाजावर हल्ले करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा नार्को टेस्ट करायला पाहिजे”, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे.

 

First Published on: May 15, 2023 11:50 AM
Exit mobile version