नितीन गडकरींना का वाटते लाज?

नितीन गडकरींना का वाटते लाज?

केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी

राज्यातील रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये त्याबद्दल प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. रस्त्यांच्या दुरूस्तासाठी, खड्डे बुजवण्यासाठी तारीख पे तारीख असाच प्रकार सुरू आहे. पण, पदरी निराशाच. राज्यातील रस्त्यांच्या स्थितीवर केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी मंत्री म्हणून मला लाज वाटत असल्याचे उद्विग्न उदगार नितीन गडकरी यांनी काढले. शिवाय, हे पाप आघाडी सरकारचे आहे. रस्त्याच्या कामाकरता नव्यानं कंत्राटदार नेमला असून त्याला काम वेळेत पूर्ण करण्याची तंबी दिल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

मुंबई – गोावा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या महामार्गावरील पळस्पे ते इंदापूरदरम्यानचे काम रखडले आहे. रस्त्याची स्थिती अंत्यंत वाईट आहे. मला ४ किलोमीटरचे अंतर कापायला अर्धा तास लागला. मंत्री म्हणून मला या रस्त्याची लाज वाटते. असे नितीन गडकरी यांनी म्हटले. शिवाय, याबद्दल त्यांनी आघाडी सरकारला लक्ष्य केले. दरम्यान, मुंबई – गोवा महामार्गाचे काम मार्च पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

मुंबईमध्ये ‘अ‍ॅम्पीबियस बस’ सेवा

नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत मुंबईकरांसाठी समुद्रात आणि जमिनीवर धावू शकणारी ‘अ‍ॅम्पीबियस बस’ सेवा सुरू करण्याचे प्रयत्न केले. पर्यटनासाठी ही बस सोयीची ठरली असती. मात्र, बससाठी मलबार हिल परिसरात छोटी जेट्टी उभारण्यास उच्च न्यायालयाने नेमलेल्या पर्यावरणीय समितीने नकार दिला. त्यामुळे ही बस अडगळीमध्ये आहे. त्यामुळे ही बस आपण सर्वांनी मिळून गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात विसर्जित करून टाकू. अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आपला संताप व्यक्त केला.

First Published on: August 25, 2018 1:46 PM
Exit mobile version