प्रवाशांना बाप्पा पावला; रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नाही

प्रवाशांना बाप्पा पावला; रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नाही

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या रविवार रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक राहणार नाही. मुंबईसह आसपासच्या परिसरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने या संदर्भात माहिती दिली आहे. (No mega block on central railway western railway harbor railway on Sunday)

रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी बरेच लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक राहणार नाही. दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रेल्वे मार्गांवरील दुरूस्तीचे कामे केली जातात. त्यामुळे प्रवाशांना रविवारी रेल्वे प्रवास करताना वेळापत्रक पाहून नियोजन करावे लागते. परिणामी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

दरम्यान, 2 वर्षानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशभर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. आता कोरोना महामारीतून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा सर्वच सणांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.

यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यातच मुंबईत गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेश भक्त सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे मुंबईत मोठी गर्दी होत असते. त्यातच मुंबईकरांना लोकलचा प्रवास सोईचा आहे.


हेही वाचा – अशोक चव्हाणांचे वृत्त दिशाभूल करणारे, बाळासाहेब थोरातांचे मोठं वक्तव्य

First Published on: September 2, 2022 8:00 PM
Exit mobile version