सीमावादात कुणीही पक्षाचा वाद आणू नये; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

सीमावादात कुणीही पक्षाचा वाद आणू नये; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद हा जुनाच आहे. हा वाद नेहमीच सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आताही या महाराष्ट्र – कर्नाटक या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा यावरून सरकार वर टीका केली त्याला फणवीसांनी उत्तर देईल आहे. याच संदर्भांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

याच प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि केंद्रात सुद्धा भाजपचे सरकार आहे आणि म्हणूनच कोणत्याही मागण्या करण्यात येत आहे, यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, मला याना असा प्रश्न विचारायचा आहे भाजपपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि केंद्रात काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार होते. मग तेव्हा महाराष्ट्रात आणि कर्नाटक हा प्रश्न सुटला का असा सवाल सुद्धा फडणवीसांनी उपस्थित केला.

त्यामुळे प्रत्येकाने बोलताना विचार केला पाहिजे. याचसोबत दोन्ही राज्यांत सरकार बदलत गेली दोन्ही राज्यांच्या सरकारने वेळोवेळी भूमिका घेतली. महाराष्ट्रात यापूर्वी पक्षाचा वाद हा सीमावादात आणला नाही, यापुढेही आणू नये त्यामुळे सीमावाद संदर्भात आपला दावा खिळखिळा होईल असेही फडणवीस म्हणाले.

मी कोणतेच चिथावणीखोर वक्तव्य केले नाही
या सर्व प्रकरणी फडणवीस चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीस म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य केले नाही. मी एवढेच सांगितले की बेळगाव, कारवार आणि निपाणीसह जी गावे आहेत त्या गावांवर आमी दावा सांगितल आहे आणि त्या साठी आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देतोय, ती आमची भूमिका आहे. भूमिका मांडणे याला चिथावणीखोर चुकीचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहुल आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर जी मागणी केली आहे त्याला कोणीही चिथावणीखोर म्हणू शकत नाही.


हे ही वाचा –  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

First Published on: November 24, 2022 7:18 PM
Exit mobile version